लसीकरणाचा पुढचा टप्पा 1 मे पासून! या तारखेपासून नोंदणीला होणार सुरूवात

18 ते 45 वर्षाच्या नागरिकांसाठी 1 मे पासून सुरू होणार आहे

Updated: Apr 25, 2021, 03:12 PM IST
लसीकरणाचा पुढचा टप्पा 1 मे पासून! या तारखेपासून नोंदणीला होणार सुरूवात title=

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तीसरा टप्पा म्हणजेच 18 ते 45 वर्षाच्या नागरिकांसाठी 1 मे पासून सुरू होणार आहे. यासाठी 28 एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार आहे.

1 मे पासून देशातील सर्व 18 ते 45 वर्षाच्या नागरिकांसाठी लसीकरण उपलब्ध असणार आहे. त्यासाठी 28 एप्रिल पासून नोंदनी करता येणार आहे.

अशी करा नोंदणी:

भारत सरकारच्या cowin.gov.in वर जाऊन नोंदणी करता येणार आहे. त्यानुसार दिलेल्या केंद्र आणि वेळेवर 18 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना लशीच्या मात्रा देण्यात येणार आहे.

----------------------

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढतीच

 राज्यात आता कोरोनाचे 67,160 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 676 जणांना आपला जीव गमवला आहे. आज राज्यात 63,818 जणांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 34,68,610 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.02 टक्के झाले आहे.

आजपर्यंत राज्यात 2,54,60,008 जणांची कोरोना चाचणी झाली असून 42,28,836 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 41,87,675 व्यक्ती होमक्वारांटाईन असून 29,246 व्यक्ती सांस्थात्मक क्वारांटाईन आहेत. राज्यात आज 6,94,480 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

नाशिकमध्ये आज 5034 जणांनी कोरोनावर मात केली असून 5918 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर गेल्या 24 तासात 46 जणांचा मृत्यू झाला आहे.