अमित राज ठाकरेंना आला 'हा' अनुभव, हॉस्पिटलमधून घरी आल्यावर केली पोस्ट

 पुढचा एक आठवडा होम क्वारंटाईन 

Updated: Apr 25, 2021, 11:04 AM IST
अमित राज ठाकरेंना आला 'हा' अनुभव, हॉस्पिटलमधून घरी आल्यावर केली पोस्ट title=

मुंबई : मनसे नेते अमित राज ठाकरे (Amit Raj Thackeray) यांना कोरोनाची लागण झाली होती. पण आता ते बरे झाले असून रुग्णालयातून घरी आले आहेत. घरी आल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून सर्वांचे आभार मानले आहेत. शुभेच्छांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते, याचा अनुभव मी नुकताच घेतला असे अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. मी हॉस्पिटलमधून घरी परतलोय आणि माझी तब्येत चांगली आहे. दक्षता म्हणून पुढचा एक आठवडा होम क्वारंटाईन असेन असे ते म्हणाले. 

May be an image of text that says "शुभेच्छांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते, याचा अनुभव मी नुकताच घेतला. मी हॉस्पिटलमधून घरी परतलोय आणि माझी तब्येत चांगली आहे. दक्षता म्हणून पुढचा एक आठवडा 'होम क्वारंटाइन' म्हणजे घरातच असेन. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार. तुम्ही सर्वांनीही काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. Bn"

सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच सर्वांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

राज्यातील कोरोना संसर्ग बेफाम गतीने वाढत आहे. सेलिब्रेटी, राजकाणी ते सर्वसामान्य जनता सर्वांनाचा कोरोना संसर्गाने विळखा घातला आहे. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

अमित ठाकरे यांनी काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं जाणवत होती. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अमित यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घरातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी ही खबरदारी घेतली होती.