मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. देशात आता लॉकडाऊन वाढवून ३ मेपर्यंत करण्यात आलं आहे. असं असताना आता देशातील मजुरांची गैरसोय होताना दिसत आहे. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करून सरकारकडे 'उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स..' अशी मागणी केली आहे.
पंकजा मुंडे यांनी मजुरांवर होणाऱ्या अन्यायाला आपल्या ट्विटच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली,धान्य भिजलय,आज अन्न गेलं नाही गळ्याखाली!बिचारे मजूर Isolationने आजारी पडतील सर्व शिस्त पाळून,कष्ट करून त्यांच्या ताटात माती?ते हॉट स्पॉट मध्ये नाहीत न हॉट स्पॉट ला जाणार आहेत मग काय प्रॉब्लेम?उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!!
इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली,धान्य भिजलय,आज अन्न गेलं नाही गळ्याखाली!बिचारे मजूर Isolationने आजारी पडतील सर्व शिस्त पाळून,कष्ट करून त्यांच्या ताटात माती?ते हॉट स्पॉट मध्ये नाहीत न हॉट स्पॉट ला जाणार आहेत मग काय प्रॉब्लेम?उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!! pic.twitter.com/Is2bTxKnfv
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 16, 2020
लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योगधंदे बंद आहेत. अशावेळी भारताच्या कानाकोपऱ्यातून मजुर काम करण्यासाठी मुंबईत येतात. पण आता मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित केला आहे. अशावेळी या कामगारांची गैरसोय होत आहे. या मजूरांना जेवणासाठी अन्न नाही. त्यांना राहण्याची योग्य अशी व्यवस्था नाही.
१४ एप्रिल रोजी पंतप्रधानांनी घोषित केलेला पहिला लॉकडाऊन संपणार होता. यावेळी वांद्रे येथे सायंकाळी ४ वाजता हजारोंच्या संख्येत अनेक मजुर गोळा झाले. आपापल्या गावी, घरी जाण्यासाठी हे मजूर एकत्र वांद्रे स्थानकात जमले होते. त्यावेळी सोशल डिस्टन्शिंगचं नियम धाब्यावर बसवण्यात आले.