Coronavirus: मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाचा परिसर निर्मनुष्य करणार

कालच हिंदुजामधील एका प्रसिद्ध डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 

Updated: Mar 27, 2020, 07:40 PM IST
Coronavirus: मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाचा परिसर निर्मनुष्य करणार title=

मुंबई: कोरोना विषाणूच्या (COVID-19) शहरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे माहीम येथील हिंदुजा रुग्णालयाचा परिसर निर्मनुष्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयाच्या आजुबाजूच्या परिसरात कोणालाही फिरकू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनाशी युद्धासाठी भारतीय लष्कर सज्ज, सहा तासांचा प्लान तयार

कालच हिंदुजामधील एका प्रसिद्ध डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या डॉक्टरच्या नातवाचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तो काही दिवसांपूर्वी लंडनमधून परतला होता. त्यामुळे आता हिंदुजातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

सांगलीत २३ जणांपर्यंत कसा पोहोचला कोरोना?

तर दुसरीकडे आज दिवसभरात राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. काल संध्याकाळपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा १२५ इतका होता. मात्र, गेल्या २४ तासांमध्ये ही संख्या थेट १५३ वर जाऊन पोहोचली आहे. आज सांगलीत कोरोनाचे १२ नवे रुग्ण आढळून आले. तर नागपूरमध्ये कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले. यामध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. तर मुंबईत पाच आणि वाशीत एक नवा रुग्ण आढळून आला.