मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला कोरोनाशी लढण्यासाठी विश्वास दिला आहे. कोरोनावर आपण लवकरच मात करू तुम्ही फक्त घरी राहून सहकार्य करा. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनच्या काळात महिलांवर अत्याचार होत असतील तर त्यांनी १०० नंबरवर संपर्क साधावा. आपला भाऊ मदतीसाठी आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेLIVE
मुंबई महापालिका आणि बिर्ला यांच्या सौजन्याने मदत सुरू
१८००१२०८२००५० या क्रमांकावर संपर्क साधा
आदिवासी आणि प्रोजेक्ट मुंबई, प्रफुल्ल यांच्या सेवेतून मदत सुरू
१८००१०२४०४० या क्रमांकावर संपर्क साधाhttps://t.co/HOK58cBO5u@CMOMaharashtra @ashish_jadhao pic.twitter.com/Ncr41LFdxl— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 19, 2020
तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे कोणतही काम न करता घरात राहणं यापेक्षा मोठी शिक्षा नाही. पण याकाळात काही अडचणी आल्या तर मुख्यमंत्र्यांनी दोन नंबर दिले आहेत. त्यावर क्रमांक साधून आपल्या काही समस्या असतील तर त्या सोडव्याव्यात अशी माहिती यावेळी दिली. (मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे)
मुंबई महापालिका आणि बिर्ला कंपनी यांच्या सौजन्याने मदत कार्य सुरू आहे. अशावेळी जनतेने काही मदत लागल्यास १८००१२०८२००५० या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच आदिवासी पाड्यातही मदत कार्य सुरू आहे. प्रोजेक्ट मुंबई, प्रफुल्ल संस्था ही सेवा पुरवत आहेत. त्यांनी १८००१०२४०४० या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.