पीपीई किटपासून प्रत्येक गोष्ट डॉक्टरांना पुरवू- मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.

Updated: Apr 19, 2020, 01:50 PM IST
पीपीई किटपासून प्रत्येक गोष्ट डॉक्टरांना पुरवू- मुख्यमंत्री title=

मुंबई : पीपीई किटसह सर्व सुविधा डॉक्टरांना पुरवल्या जातील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आज त्यांनी पुन्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी हा संवाद साधला. पीपीई किट किंवा उपकरणांचा तुटवडा असल्याची सत्यता त्यांनी यावेळी मान्य केली. पण मुंबईसह राज्यभरातील डॉक्टरांनी कोविड व्यतिरिक्त तपासणी करण्यासाठी क्लिनिक सुरु ठेवण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातील इतर डॉक्टरांनाही त्यांनी असे करण्याचे आवाहन केले.

 मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. शनिवारी दिवसभरात ३१८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. वांद्रे येथील गर्दी प्रकरणानंतर ते जनतेसमोर आले होते. त्यावेळी त्यांनी जनतेला त्यांनी लॉकडाऊन पाळण्याचे पुन्हा आवाहन केले होते. 

राज्यात काही जिल्हे शुन्य कोरोना रुग्णांंचे आहेत. राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन झोन करण्यात आले आहेत. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये माफक स्वरुपात उद्योग धंद्यांना परवानगी देण्यात आली आहे. 

जिल्ह्याच्या वेशी आपण उघडल्या नाहीत. केवळ मालवाहतूक होत राहील. पण नागरिकांनी येथून येजा करु नये असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

वृत्तपत्रांवर बंदी नाही. ती स्टॉलवर उपलब्ध राहतील. पण मुंबई, पुणे यासारख्या रेड झोनमध्ये वृत्तपत्र घरोघरी देण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी नाकारली आहे. 

शासनातर्फे काही हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आले आहेत. महिलांसाठी १०० नंबरवर सहकार्य उपलब्ध असणार आहे. १८०० १२० ८२००५० या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. १८०० १०२ ४०४० हा क्रमांक आदिवासी विभागाच्या  सहकार्याने सुरु आहे. 

६६,६९६ चाचण्या झाल्या आहेत. ९५ टक्के लोकांच्या टेस्ट निेगेटीव्ह आल्या आहेत. साधारण ३६०० हे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. साधारण ३५० जण बरे होऊन घरी गेले आहेत. 

गंभीर लक्षणं असलेल्यांना वाचवण्याला प्राथमिकता दिली जात आहे. कोणाला अशी लक्षण आढळली तर न घाबरता रुग्णालयात या असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

बऱ्याचवेळेला शेवटच्या टप्प्यात हे रुग्ण रुग्णालयात येत आहेत. रिपोर्ट येण्यात काही वेळ जातो.  

मुंबई-पुणे वगळून इतर राज्यात काही करता येईल याचा निर्णय येत्या दोन-तीन दिवसात होईलं

खासगी डॉक्टर्स हे नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी दवाखाने खुले ठेवणार आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील डॉक्टर सज्ज झाले आहेत. आजही पीपी किटसारख्या उपकरणांचा थोडाफार तुटवडा आहे. 

जवळपास ८० ते ९० टक्के लोकांपर्यंत धान्य पोहोचवले आहे. आधारभूत किंमतीच्या बाबतीत केंद्र मदत करत आहे. 

राज्याची अवस्था 'सरणार कधी रण ?' अशी झाली आहे. शत्रु अदृश्य असल्याने त्याला हरवणं कठीण आहे. पण याला आपण ऐतिहासिक लढा देत आहोत.  

२० एप्रिलला हे युद्ध पूर्ण करुन सहा आठवडे होणार आहेत.