मुंबईत कोरोना आणीबाणी, महापालिका आयुक्तांचा ऍक्शन प्लान तयार

महापालिका कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सज्ज 

Updated: Apr 12, 2021, 10:08 AM IST
मुंबईत कोरोना आणीबाणी, महापालिका आयुक्तांचा ऍक्शन प्लान तयार  title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : कोरोनाचा उद्रेक महाराष्ट्रात वाढत असताना मुंबईत कोरोना आणीबाणीची वेळ आली आहे. मुंबईत 9 हजार 989 नव्या कोरोना  रूग्णांची नोंद झाली आहे.  धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासांत तब्बल 58 जणांचा बळी गेला आहे. मुंबईत देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वातावरण चिंता वाढवणारं आहे.  असं असताना महापालिका आयुक्तांचा महापालिकेचा ऍक्शन प्लॉन तयार करण्यात आला आहे. 

मुंबईतील कोविड पेशंटला योग्य बेड मिळण्यासाठी महापालिका कठोर कार्यपद्धती अवलंबणार

1) नोडल ऑफिसकरकडून फास्ट ट्रॅक पद्धतीने बेड वाटप

 २४ वॉर्डातील वॉर रूमसाठी आणि जम्बो फिल्ड हॉस्पिटलसाठी नोडल आधिकाऱ्यांची नेमणूक करणार आहेत. तसेच दोन शिफ्टमध्ये करणार काम दुपारी ३ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ यावेळेत नोडल अधिकारी काम पाहणार आहेत. 

वॉर्ड वॉर रूम्सचे नोडल अधिकारी जंबो फील्ड हॉस्पिटल आणि वॉर रूम एकमेकांशी सतत संपर्कात राहतील जेणेकरून बेड्स लागणाऱ्या रूग्णांकरता बेडचे वाटप करणं सहज शक्य होईल 

विशेषत: रात्री ११ ते सकाळी ७ दरम्यान सर्व खाटांचे वाटप प्रामुख्याने फक्त जंबो फिल्ड हॉस्पिटलमध्ये आणि वॉर्ड वॉर रूम्समध्ये अनुक्रमे नोडल अधिकाऱ्यांकडून रात्री संपूर्ण फास्ट ट्रॅक पद्धतीनं  बेड वाटप केले जाईल.

हॉस्पिटलमधील बेडस् विनाकारण अडवले जाऊ नयेत म्हणून हॉटेल्सची मदत

काही मोठ्या तारांकित हॉटेल रूग्णांना मोठ्या प्रमाणात बेड उपलब्ध करुन देण्यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित केले जातील. या केंद्रात प्रशिक्षित डॉक्टर्स नेमले जातील

पालिकेने मुंबईतील रूग्णालयात ३२५ अतिरिक्त आयसीयू बेड जोडले आहेत. त्यामुळे आताची आयसीयु बेडची संख्या २४६६ वर गेली आहे, तर १९१५१ बेड वाटप डॅशबोर्डवरील कोविड बेड झाले असून इतर १४१ रुग्णालये आहेत त्यातील  ३७७७ बेड रिक्त आहेत.

पालिका येत्या ७ दिवसांत ११०० अतिरिक्त कोविड केअर सेंटर  १२५ आयसीयूसह कार्यान्वित करेल.

मुंबईत बेड वाढवण्यासाठी युद्धस्तरावर काम

मुंबईतील विविध खाजगी रूग्णालयांमधील ३२५ आयसीयू बेडही पालिकेच्या डॅशबोर्डवर घेतले असून पालिकेच्या वॉर रूममार्फतच त्या बेडवर रूग्ण पाठवले जातील. यामुळे डॅशबोर्डवरील ऑनलाईन आयसीयू बेडची संख्या वाढून २४६६ झाली आहे. तसेच एकूण कोवीड बेडची संख्या १९१५१ झाली असून यातील ३७७७ बेड रिकामे आहेत

मुंबई महापालिका येत्या आठवड्यात आणखी ११०० बेड उपलब्ध करून देणार असून यात १२५ आयसीयू बेड आहेत

मुंबईत येत्या दीड महिन्यात आणखी तीन ठिकाणी जम्बो कोवीड सेंटर उभी राहणार असून याद्वारे २ हजार बेड उपलब्ध होतील. यातील ७०टक्के बेड ऑक्सीजनचे असतील व २०० बेड आयसीयूचे असतील.