मुंबई : सरकारी पैशाचा चुराडा केल्याचं ढळढळीत उदाहरण आज आपल्या मंत्रालयात पुढे आलंय. जनतेच्या खिशातून कोट्यवधी रुपये खर्च करून पुढे मंत्रालयाच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली बांधण्यात आलेल्या दर्शनी भागातल्या पायऱ्या आता पाडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंत्रालयाच्या दर्शनी भागांत असलेल्या आणि एशियाटिक लायब्ररीची आठवण करून देणाऱ्या पाय-या अखेर तोडल्या जाणार आहेत. या पाय-यांचे करायचे काय यावर वर्षभरापेक्षा जास्त डोकेफोड केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं अखेर पाय-या तोडण्याचा निर्णय घेतला घेतला आहे. मंत्रालयत लागलेल्या आगीनंतर मंत्रालयाबाहेर पायऱ्या बांधण्यात आल्या. पण आता या पायऱ्या तोडण्यात येणार असल्याचेही समोर येत आहे. तोडणारच होते मग पायऱ्या बांधायच्या कशाला ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
१५ ऑगस्ट वगळता या पायऱ्यांचा उपयोग करु दिला जात नाही. या पायऱ्या नेमक्या कशासाठी बांधण्यात आल्या ? किती खर्च आले ? याची भरपाई कशी करणार ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा सर्व खर्च जनतेच्या पैशातून करण्यात आला. याची उत्तर कोणी देत नसल्याचे वास्तवही समोर येत आहे. या पायऱ्या पहिल्या मजल्यापर्यंत येणार होत्या. तिथे नागरिकांची विचारपूस होऊन पुढे पाठविले जाणार असे नियोजन होते पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही आणि जनतेच्या पैशांचा चुराडा झाला.