मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या मालकीच्या ६ ठिकाणांवर ईडीनं छापे घेतलेत. बांद्रातल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मनी लॉन्ड्रिंग केल्याचा सिद्दीकी यांच्यावर आरोप आहे.
कोट्यवधी रूपयांची ही मनी लॉन्ड्रिंग असल्याचं सांगण्यात येतं. सिद्दीकी यांचे जवळचे सहकारी आणि बिल्डर रफीक मकबूल कुरेशी यांच्या घरावरही ईडीनं छापे घातले आहेत.
या छाप्यांविषयी माजी मंत्री बाबा सिद्दीकी किंवा काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया अजून आलेली नाही. बाबा सिद्दीकी हे काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांचे राजकारणातील राईट हँड मानले जातात. राजकीय वर्तुळात बाबा सिद्दीकी यांचा वांद्रे परिसरात दबदबा असल्याचं सांगण्यात येत.