काँग्रेसच्या तीन नगरसेवकांना पक्षातून कारणे दाखवा नोटीस

विरोधकानी शिवसेनेवर घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

Updated: Jan 6, 2019, 07:46 AM IST
काँग्रेसच्या तीन नगरसेवकांना पक्षातून कारणे दाखवा नोटीस  title=

मुंबई : मुंबई महापालिकेतील काँग्रेसच्या तीन नगरसेवकांना पक्षानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सुधार समितीच्या बैठकीत आरक्षित सहा भूखंड खरेदी करण्याचे प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने रेकॉर्ड केले. त्यावरून विरोधकानी शिवसेनेवर घोटाळा केल्याचा आरोप केला. मात्र या प्रस्तावांना विरोध न करता गप्प बसणाऱ्या काँग्रेसचे नगरसेवक आश्रफ आजमी, विठ्ठल लोकरे, जावेद जुनेजा यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्यात. त्यामुळे या प्रकरणासंबंधी या तिन्ही नगरसेवकांना खुलासा करावा लागणार आहे.

भूखंड घोटाळ्याचा आरोप 

 पालिका सुधार समितीच्या बैठकीत ३१ डिसेंबर रोजी पोयसर, कांदिवली, मालाड येथील शाळा, क्रीडांगण,रस्ता यांसाठी आरक्षित भूखंड खरेदी बाबतचे सहा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने भूखंडांवर १००% अतिक्रमण असल्याचे कारण देत रेकॉर्ड केले. त्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाच्या गटनेत्यांनी शिवसेनेला टार्गेट करीत भूखंड घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मात्र वास्तविक हे प्रस्ताव मंजूर करताना कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकाने विरोध केला नव्हता. 

नगरसेवकांना झापले

ही गंभीर बाब उघडकीस आल्यानंतर भाजपाने त्यांच्या नगरसेवकांना झापले. तर आता मुंबई काँग्रेसचे पक्ष निरीक्षक, महासचिव भूषण पाटील यांनी तिन्ही नगरसेवकांना नोटीस पाठवून लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आरोपात काही तथ्य होत का ? की शिवसेनेच्या दबावापुढे कॉंग्रेस नगरसेवक झुकले हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.