'इंग्रजांच्या धोरणाची अंमलबजावणी सुरु आहे' काँग्रेसची भाजप सरकारवर टीका

अजून किती लोकांना त्यांना जेलमध्ये टाकायचं आहे - नाना पटोले यांचा सवाल

Updated: Jul 31, 2022, 02:05 PM IST
'इंग्रजांच्या धोरणाची अंमलबजावणी सुरु आहे' काँग्रेसची भाजप सरकारवर टीका title=

Sanjay Raut ED Inquiry : आमच्या विरोधात जो बोलेले त्याच्यावर कारवाई करू अस इंग्रजांनी आणलेल्या धोरणाची अमंलबजावणी भाजप (BJP) सरकार करतंय अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. 

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर कारवाई नवीन नाही, दबाव टाकून कारवाई केली जात आहे. अजून किती लोकांना त्यांना जेलमध्ये टाकायचं आहे असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थि केला आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांनात्यांची जागा दाखवेल असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

आपलं पाप लपविण्यासाठी अशी कारवाई करणे हे नवीन नाही. अग्निपथ योजनेतील तरुणांचा उद्रेक वाढल्यानंतर लगेच ईडी कार्यालयात बोलवून वातावरण बदललं गेलं, मूळ विषयाला डायव्हर्ट करण्यात भाजप एक्सपर्ट असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली.

राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जो खंजीर महाराष्ट्राच्या पाठीत खुपसला जो घाव केला त्याला जनता कधी विसरणार नाही. राज्यपालांनी कार्यालयात भाजप कार्यालय उघडले आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल अशी टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.

'राज्यात घाणेरडं राजकारण सुरु आहे'
एका पार्टीला संपवून आम्ही कसे जिवंत राहू अश्या पद्धतीच घाणेरडे राजकरण 75 वर्षात कोणी केले नाही, धनुष्यबाण गोठविण्याच काम आता ते करणार आहेत, हे खालच्या पातळीच आणि लोकशाहीला घातक राजकरण केंद्रातलं भाजप सरकार करतय हे स्पष्ट झाले आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी म्हटलंय.