शाळा सुरू करण्यावरून सरकारमध्येच गोंधळ, अंतिम निर्णय अजून बाकीच

तिसरी लाट येईल अशी शक्यता असल्याने टास्क फोर्सचा शाळा सुरू करायला विरोध आहे

Updated: Aug 11, 2021, 07:20 PM IST
शाळा सुरू करण्यावरून सरकारमध्येच गोंधळ, अंतिम निर्णय अजून बाकीच title=

मुंबई : शाळा सुरू करण्याबाबत सरकारमध्येच प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचे परिपत्रक जारी केलं.  मात्र तरीही शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही. कारण शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री, टास्क फोर्स, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय होईल. 

तिसरी लाट येईल अशी शक्यता असल्याने टास्क फोर्सचा शाळा सुरू करायला विरोध आहे त्यामुळे ही बैठक होईल आणि अंतिम निर्णय होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाची स्थिती पाहून राज्यात त्या त्या भागात तिथलं प्रशासन शाळा-कॉलेज उघडण्याबाबत निर्णय घेतील, टास्क फोर्स आणि पिडीयाट्रीक टास्क फोर्स सर्वांनीच शाळा-कॉलेज सुरु करण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे बैठकीत शाळा-कॉलेजबाबत अंतिम निर्णय होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.