मुंबई : डॉक्टरांची (Doctor) बदनामी केल्याप्रकरणी कॉमेडियन सुनील पाल (comedian Sunil Pal) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना काळात रुग्णांची दिवस-रात्र सेवा करणार्या डॉक्टरांची बदनामी करणारे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कॉमेडियन सुनील पालविरुद्ध अंधेरी पोलीस (Andheri Police ) ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अभिनेता सुनील पाल यांनी डॉक्टरांविषयी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यात डॉक्टरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत टिका करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर सैतानाच्या वेशात फिरत आहेत. कोरोनाच्या नावाने डॉक्टरांकडून गरिबांना घाबरविले जात आहे. असे मत मांडण्यात आले आहे .
हॉस्पिटलमध्ये बेड, औषध, प्लाझ्मा नाही, असे सांगून त्यांचे मानसिक शोषण केले जात आहे. गरिब रुग्णांचा सायंकाळपर्यंत मृत्यू होईल. याची पुरेपुरे काळजी घेतली जात आहे असे वक्तव्य व्हिडिओत केले होते.या प्रकरणी एका डॉक्टरांच्या संघटनेकडून दाखल केलेल्या अर्जानुसार अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
भारतीय कायदा कलम 500 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, याबाबत सुनील पाल याने हे सर्व डॉक्टर यांच्याबद्धल नव्हते,असे स्पष्टीकरण दिले आहे. लवकरच या प्रकरणाच्या चौकशीसठी पोलीस सुनील पालला चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.