मुंबईत आणखी थंडीचा जोर वाढणार, उत्तरेकडून थंड वारे वाहणार

मुंबई शहर (Mumbai) आणि उपनगरात आणखी थंडीचा (cold) जोर वाढणार आहे.  

Updated: Dec 28, 2020, 08:34 AM IST
मुंबईत आणखी थंडीचा जोर वाढणार, उत्तरेकडून थंड वारे वाहणार  title=
Pic Courtesy: ANI

मुंबई : मुंबई शहर (Mumbai) आणि उपनगरात आणखी थंडीचा (cold) जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) यासंदर्भात माहिती दिली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा जोर वाढणार आहे. (The fall in temperatures are mostly due to the cold  northerly to north westerly winds). पुढचे दोन ते तीन दिवस मुंबईत थंडीचा मुक्काम असणार आहे.

तापमानात घट होणार आहे. उत्तर भारतात थंडी आहे. याचा परिणाम हा पुढील काही दिवस दिसून येणार आहे. तापमानात घट होणार असल्याने पुढील दोन ते तीन दिवस आणखी तापमानात घट होऊन थंडीत वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुन्हा हुडहुडी वाढणार आहे.

दरम्यान, पुण्यात छान धुकं पसरले आहे. रस्ते आणि इमारती धुक्यात हरवल्यात.मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांचा उत्साह या परसरलेल्या धुक्यामुळे द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले.