Cocaine In Soap : बापरे! मुंबई सापडलेल्या 'त्या' 16 साबणांची किंमत 33 कोटी 60 लाख; अधिकारीही चक्रावले

Cocaine Worth Rs 33 Crore 60 Lakh Hidden In Soap Boxes: मुंबई विमानतळावर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये अधिकाऱ्यांना या व्यक्तीच्या बॅगमध्ये 16 साबण सापडले ज्यात ड्रग्ज लपवले होते.

Updated: Feb 3, 2023, 09:26 AM IST
Cocaine In Soap : बापरे! मुंबई सापडलेल्या 'त्या' 16 साबणांची किंमत 33 कोटी 60 लाख; अधिकारीही चक्रावले title=
Cocaine Hidden In Soap Boxes

Cocain in Soap Seized at Mumbai Airport : महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence म्हणजेच DIR) बुधवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) एका भारतीयाला अटक केली आहे. ही व्यक्ती 3.36 किलोग्राम वजनाच्या कोकेनची तस्करी करत होती असं तपासणीदरम्यान स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कोकेनची किंमत 33 कोटी 60 लाख (Rs 33 Crore 60 Lakh) रुपये इतकी आहे. अदिस अबाब विमानतळावरुन इथोपिया एअरलाइन्सच्या मुंबईला आलेल्या विमानातून ही व्यक्ती आली होती. या व्यक्तीने चक्क साबणामध्ये हे कोकेन लपवलं होतं.

नेमकं काय सापडलं या व्यक्तीकडे?

'डीआयआर'च्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी या व्यक्तीला चौकशीसाठी थांबवलं. अदिस अबाब विमानतळावरुन मुंबई आलेल्या ईटी-640 या इथोपिया एअरलाइन्सच्या विमानाने ही व्यक्ती प्रवास करत होती. अधिकाऱ्यांनी या व्यक्तीच्या बॅगेची झडती घेतली तेव्हा त्याच्या बॅगेत 16 साबण (Cocaine Hidden In Soap Boxes) आढळून आले. या साबणांची तपासणी केली असता अधिकाऱ्यांना संक्षय आला. त्यांना या साबणांच्या आतमध्ये काहीतरी लपवलं असल्याची शंका आल्याने त्यांनी साबणांची वरची लेअर काढली. त्यानंतर साबणाला मध्यभागी होल पाडल्यानंतर त्यामध्ये ट्रान्सफरंट प्लास्टिकमध्ये कोकन भरल्याचं आढळून आलं असं डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

या व्यक्तीची चौकशी

या साबणांमधून तब्बल 3 किलो 360 ग्राम कोकन अधिकाऱ्यांना सापडलं. या कोकनेची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 33 कोटी 60 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं असून तो नेमक्या कोणत्या टोळीसाठी काम करतो, यापूर्वी असा प्रकार केला आहे का यासारख्या गोष्टींबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत.

वेगवेगळ्या माध्यमातून तस्करी

अशाप्रकारे सोन्याची तस्करी पकडली जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. देशातील वेगवेगळ्या विमातळांवर यापूर्वी अशाप्रकारे सोन्याची, ड्रग्जची तस्करी पकडण्यात आल्याची उदाहरणे आहेत. यामध्ये अगदी ब्रासारख्या अंतर्वस्त्रांपासून ते कोलगेटपर्यंत अनेक गोष्टींमधून मैल्यवान वस्तूंबरोबरच ड्रग्जचीही तस्करी करण्यात आल्याचं समोर आलं आहे.