देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बीडीडी चाळींच्या पुनर्वसनाच्या कार्यक्रमात गंभीर इशारा दिला आहे. सतत होणाऱ्या टीकेवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलंच नाव न घेता सुनावलं आहे. कौतुकाचा एक शब्द नाही. आता कौतुक केली की भीती वाटते. आम्हाला थपडांच्या धमक्या देऊ नका, एकच झापड अशी देऊ परत उठणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सुनावलं.
आमचं ट्रिपल सीट सरकार आहे. या सरकारसाठी कौतुकाचा तर एक शब्दही नाही, पण थपडांची भाषा कराल तर झापड देऊ असं मुख्य़मंत्र्यांनी सुनावलं आहे. पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आयुष्य काही काही क्षण अनपेक्षितपणे येत असतात. मुख्यमंत्री पदावर आपण असू असं स्वप्नातही नव्हतं. आता त्याच्या खोलात जात नाही. आम्ही लोकांच्या ऋणात आहोत असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
वरळीतील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता सुनावलं आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, सतेज पाटील, अरविंद सावंत, विनोद घोसाळकर, नवाब मलिक उपस्थित होते.
महापौर किशोरी पेडणेकर,पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे,खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते. आमदार कसा असावा याचे उदाहरण म्हणजे आदित्य ठाकरे आहेत असं म्हणत सतेज पाटील यांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं.