ओमिक्रॉन रोखण्यासाठी रोखण्यासाठी राज्य सरकार एक्शन मोडमध्ये, मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार वेळीच सतर्क झालं आहे. 

Updated: Nov 28, 2021, 09:48 PM IST
ओमिक्रॉन रोखण्यासाठी रोखण्यासाठी राज्य सरकार एक्शन मोडमध्ये, मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश title=

मुंबई : कोव्हिडच्या (Corona) धोकादायक ओमिक्रॉन विषाणूला (New variant Omicron)  रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते सर्व करा. केंद्र सरकारच्या (Central Government) सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी प्रशासनाला दिले आहेत. विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष द्या, असं त्यांनी सांगितलं. तसंच लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील, असंही राज्यातील जनतेला सांगितलं. नव्या कोरोना व्हेरियंटचा धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. (cm uddhav thackeray instructions to administration on the background of new variant of the Corona)

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे 

सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट होणार आहे. जरी त्यांच्याकडे निगेटिव्ह रिपोर्ट असला तरी त्यांची टेस्ट केली जाणार. देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 48 तासांपूर्वीचा आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवणे सक्तीचं असणार आहे. 

इतकंच नाही, तर बस स्टॉप , रेल्वे स्टेशन वर स्क्रीनींग करण्यात येणार आहे. राज्याच्या रस्ते सीमांवरही स्क्रीनींग केली जाणार आहे. खबरदारी म्हणून रिचर्डसन अॅन्ड क्रुडास हे जंबो कोविड सेंटर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. 

परदेशातून येणाऱ्यांना क्वारंटाईन करावं की न करावे याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. उद्या सोमवारी (29 नोव्हेंबर) नवी नियमावली जाहीर होऊ शकते.  

शाळांच काय? 

राज्यातील शाळा पुन्हा सुरु करायच्या की नाहीत, याबाबत चाईल्ड टास्क फोर्सशी चर्चा करण्यात येणार आहे. तर थोडं थांबावं आणि वेट अॅन्ड वॉचची भूमिका घ्यावी, असं टास्क फोर्सने मत व्यक्त केलं आहे. 
 
सरकार वारंवार आवाहन करुनही अनेक नागरिक हे मास्क वापरत नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेने लोकांना शिस्त लावण्यासाठी क्लिनअप मार्शलची नेमणूक केली.या मार्शलकडून रस्त्यावर थुंकणाऱ्या मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र आता या दंडात्मक रक्कमेत वाढ करायची का, याबाबतचा  निर्णय घेण्याचा अधिकार हा महापालिकाकडेच असणार आहे. 

मुख्यमंत्र्यांनी कोव्ही सेंटरचा आढावा घेतला. मधल्या काही काळात कोरोना नियंत्रणात आल्याने कोव्हिड सेटंरमधील यंत्रणांचा वापर कमी झाला होता. त्यामुळे त्या यंत्रणांची नव्याने पाहणी होणार आहे. 

ज्या देशात या नव्या व्हेरिएंटचा धोका अधिक आहे, अशा देशातून येणाऱ्यांचा 15 दिवसांचा प्रवासाचा इतिहास तपासला जाईल. जर १५ दिवसांत रिस्क कंट्री मध्ये प्रवास आढळला तर संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे.