मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टोलमाफीबाबत मोठी घोषणा

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा (Chief Minister Eknath Shinde) पदभार स्वीकारल्यापासून निर्णयाचा सपाटा लावला आहे.

Updated: Jul 6, 2022, 06:08 PM IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टोलमाफीबाबत मोठी घोषणा title=

मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा (Chief Minister Eknath Shinde) पदभार स्वीकारल्यापासून निर्णयाचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी अवघ्या काही दिवसांमध्ये अनेक निर्णय घेतले आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आता टोलमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत सीएमओ महाराष्ट्र या ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ही टोलमाफी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी असणार आहे. (cm eknath shinde has announced a decision to waive toll on vehicles of warakaris going to pandharpur for ashadi Wari)

ट्विटमध्ये काय म्हटलंय?

"कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे", असं या ट्विटमध्ये म्हटलंय.

दरवर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी हजारोंच्या संख्येने भाविक जात असतात. या भाविकांना टोलमाफी दिली जाते. त्यानुसार आता पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी टोल माफ करण्याचा निर्णय झाला आहे.

या टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी भाविकांना आपल्या गाड्यांवर संबंधित स्टिकर्स लावणं बंधनकारक असणार आहेत. या स्टिकर्स लावण्याबाबत,  आरटीओ अधिकारी आणि पोलीस नोंदणी करण्यासाठी आवश्यक तशी व्यवस्था करण्याचे आदेश हे मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.