कर्जमाफीच्या मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याघरी जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती.

Updated: Jun 24, 2017, 03:09 PM IST
कर्जमाफीच्या मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक title=

मुंबई : कर्जमाफीच्या मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे.  एक लाखाच्या कर्जमाफीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. संबंधित मंत्र्यांना तातडीने मुंबईला येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान यापूर्वी दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याघरी जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती.

ही भेट कर्जमाफीविषयी चर्चा करण्याशी संबंधित असल्याचं म्हटलं जात होतं, या बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आले याविषयी  समजू शकले नव्हते. यानंतर आज महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.