Cidco Homes : सिडकोच्या नव्या गृहप्रकल्पाचा मध्यमवर्गीयांना होणार फायदा; पाहा कशी आहे योजना

Cidco Lottery News 2024 : म्हाडाप्रमाणंच सिडकोच्या वतीनं नवी मुंबई आणि लगतच्या भागांमध्ये किफायतशीर दरात घरं उपलब्ध करून दिली जातात. ही सिडको आता एक नवी योजना सादर करत आहे.   

सायली पाटील | Updated: Feb 19, 2024, 08:07 AM IST
Cidco Homes : सिडकोच्या नव्या गृहप्रकल्पाचा मध्यमवर्गीयांना होणार फायदा; पाहा कशी आहे योजना title=
(प्रतिकात्मक छायाचित्र)/ cidco lottery panvel khanda colony redevelopnment housing real estate

Cidco Lottery News 2024 : हक्काच्या घरात असलेल्यांसाठी सिडको आणि म्हाडासारख्या (Mhada Homes) संस्था मोठा मदतीचा हात देत आल्या आहेत. जिथं Real Estate प्रकल्पाअंतर्गत घरांच्या किमती गगनाला भिडत चालल्या आहेत तिथंच या संस्था मात्र खिशाला परवडतील अशा दरात घरं उपलब्ध करून देत आहेत. अशा या सिडकोच्या वतीनं आता पनवेल भागामध्ये एक नवी योजना हाती घेण्यात आली आहे. 

सिडकोकडून पनवेलमध्ये अनेक नोड विकसित करण्यात आले असून, आता साधारण 30 ते 40 वर्षांनंतर या नोडमधील अनेक गृहप्रकल्प, बांधकामं मोडकळीस आले आहेत. गेली कैक वर्षे या गृहप्रकल्पांच्या पुनर्विकासाचा मुद्दा डोकं वर काढत होता. ज्यानंतर आता अखेर या इमारतींच्या पुनर्विकासाला मुहूर्त मिळाला आहे. 

सिडकोच्या या पहिल्या पुनर्विकास योजनेअंतर्गत तीन मजली इमारतींच्या जागेवर 14 मजली पाच टॉवर बांधले जाणार आहेत. खांदा कॉलनीतील या प्रकल्पाची निर्मिती 3 वर्षांत होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ज्यामुळं या योजनेता थेट लाभ मध्यमवर्गीय कुटुंबांना होणार आहे. खांदा कॉलनीमध्ये असणाऱ्या पीएल 6 प्रकारच्या सह्याद्री सोसायटीचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. 

दरम्यान, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नवीन पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी या भागांमध्ये असणारे सिडको नोडमधील अनेक प्रकल्प सध्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळं हे प्रकल्प मार्गी लागल्यास इथं असणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा फायदा होणार आहे.

हेसुद्धा वाचा : Weather Updates : उन्हाच्या झळा वाढणार, अवकाळी तरीही पाठ नाही सोडणार; पाहा कसं असेल आजचं हवामान 

प्राथमिक माहितीनुसार मुंबई पुणे महामार्गाला लागून असणाऱ्या खांदा कॉलनीतील गृहप्रकल्पाला पुढील काही दिवसांमध्ये नवं रुप प्राप्त होणार आहे. राज ग्रुपच्या तुलसी होममेकर कंपनीकडून हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. यामध्ये 192 जुन्या घरधारकांना वाढीव कार्पेट एरियासह प्रशस्त घरं दिली जाणार आहेत. शिवाय 460 नवी घरंसुद्धा बांधली जाणार आहेत. याव्यतिरिक्त 49 व्यावसायिक गाळ्यांचाही इथं समावेश असणार आहे.