मुंबई : Chief Minister Uddhav Thackeray on BJP : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) आजारी असल्याने त्यांना अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नव्हते. मात्र, आज ते प्रत्यक्ष कार्यक्रमात दिसले. त्यानंतर त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. कार्यक्रमात वारंवार आभासी पद्धतीने मुख्यमंत्री उपस्थित असल्याचा उल्लेख ऐकायला मिळाला. आभासी पद्धतीने उपस्थिती असली तरी पाठिंबा आभासी नाही. पाठिंबा प्रत्यक्ष असणार आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना उत्तर दिले.
मुख्य्मत्री ठाकरे म्हणाले आभासी पद्धतीने मुख्यमंत्री उपस्थित असल्याचा उल्लेख मी दोन ते तीनवेळा ऐकला. पण आभासी पद्धतीने उपस्थिती असली तरी पाठिंबा आभासी नाही. पाठिंबा प्रत्यक्ष असणार आहे. त्याचवेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही स्पष्ट केले की, मुख्यमंत्री आता बॅक इन अॅक्शनमध्ये आहेत.
तसेच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांना मुख्यमंत्री उपस्थिवरुन प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री आज बाहेर पडले आहेत. कोरोना काळात देशाच्या पंतप्रधानांनी काळजी घेतली पाहिजे, असं सांगितले. आपण शाळा, बाजार, सगळे बंद केले होते. देशाच्या पंतप्रधानांचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पाळले तर भाजपला काय त्रास होतो. भाजपच्या पोटात दुखतंय, असे थेट सवाल उपस्थित केला.
'महिलांचे आणि राज्याचं रक्षण करणे महत्वाचे काम'
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रपती पदक मिळवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतील मदत आपण अशा कामासाठी वापरु की, ज्यावेळी निधी, मनुष्यबळ, शस्त्रांची गरज भासली तरी सरकार मागे पुढे पाहणार नाही. तसेच ते पुढे म्हणाले, महिलांचे आणि राज्याचे रक्षण करणे आपले महत्वाचे काम आहे. यानिमित्ताने ज्यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचा आभारी आहे, असे ते म्हणाले.
प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत कौतुक वाटावे, असे काम आपण करत आहोत याचा अभिमान आहे. मी गृहमंत्र्यांचे आभार मानतो. महिला सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत. प्रश्न इतकाच आहे की, एका बाजूने महिला प्रगतीपथावर घोडदौड करत असताना समाजातील महिला असहाय्य आहेत. एखादी घटना घडू नयेत यासाठी आणि घडत असतील तर तिथल्या तिथे त्या आरोपींचा, गुन्हेगारांचा बंदोबस्त करणारी यंत्रणा आपल्या राज्याने सुरु केली हे अभिनामानास्पद काम आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.