मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार जयंती साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विलेपार्ले येथील आतंरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील महाजारांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी शिवसेनेचे नेते उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची पुन:स्थापना करण्यात आली. त्याचप्रमाणे महाराजांच्या प्रदर्शनाचेही उद्घाटनही करण्यात आलं. भारतीय कामगार सेनेच्या वतीने या कार्यक्रमचे आयोजन करण्यात आलं आहे. पुतळ्या बरोबरच गड किल्यांची कायम स्वरुपी प्रतिकृती उभारण्याच्या कार्याचं भूमिपूजनही करण्यात आलं. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा पुनर्स्थापना सोहळा पार पडला. यावेळी मंत्री @advanilparab, मंत्री @AUThackeray आणि भारतीय कामगार सेना अध्यक्ष सूर्यकांत महाडिक उपस्थित होते. pic.twitter.com/hWEITfqivm
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 12, 2020
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मंत्री @advanilparab जी, मंत्री @AUThackeray आणि इतर मान्यवर उपस्थित होते. pic.twitter.com/9PGD8Y59eb
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 12, 2020
आज ठिकठिकाणी मराठी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. औरंगाबादमध्ये क्रांतिचौकात आज शिवसेनेकडून शिवपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचे स्थानिक नेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली. आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी केल्या जाणार होती. मात्र या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने शिवसेनेकडून साध्या पद्धतीने शिवपूजन करण्यात आलं.