शिवसेनेच्या 'फायर' आजीची मुख्यमंत्र्यांकडू दखल, 'मातोश्री'कडून खास आमंत्रण

CM Uddhav Thackeray invited Pushpa Fame Grandma : शिवसेनेच्या आंदोलनात 'पुष्पा'फेम आजीची जोरदार चर्चा सुरु झालेय. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. बघतोच, ते येतात कसे, असा 'ठाकरी बाणा' या वयात दाखवणाऱ्या आजीची दखल 'मातोश्री'कडून घेण्यात आली आहे. 

Updated: Apr 23, 2022, 02:26 PM IST
शिवसेनेच्या 'फायर' आजीची मुख्यमंत्र्यांकडू दखल, 'मातोश्री'कडून खास आमंत्रण title=

मुंबई : CM Uddhav Thackeray invited Pushpa Fame Grandma : शिवसेनेच्या आंदोलनात 'पुष्पा'फेम आजीची जोरदार चर्चा सुरु झालेय. आजीचे वय होऊनही ती शिवसेनेच्या आंदोलनात पुढे होती. साहेबांच्या दारात कोणीही येतो, असे सांगत आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. बघतोच, ते येतात कसे, असा 'ठाकरी बाणा' या वयात दाखवला. याची दखल 'मातोश्री'कडून घेण्यात आली आहे. 

 शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र्यादरम्यान 'झी २४ तास'च्या टीमची नजर पडली ती एका आजीवर आणि या आजीकडून राणा दाम्पत्याच्या या भूमिकेविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न केल्यानंतर आजींनी थेट आपली पुष्पा स्टाईल दाखवली. 'झुकेगा नही साला' हा पुष्पा सिनेमातील डॉयलाग आठवला. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहेत. फायर आहोत, असे आजीने स्पष्ट केले. आता या आजीची दखल थेट 'मातोश्री'ने घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रभागा आजींना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आराम करा. धावपळ करुन नका. त्याचवेळी 'मातोश्री'वर या असे खास आमंत्रण दिले आहे. ही बातमी कळताच आजींना गहिवरुन आले. (Chief Minister Uddhav Thackeray invited Pushpa Fame Grandma Chandrabhaga)

शिवसेनेची 'फायर' आजी, दाखवली पुष्पा स्टाईल

शिवसेनेच्या आजीची आंदोलनात चर्चा होती. आमच्या साहेबांच्या बंगल्यावर येण्याची हिम्मत कशी झाली. शिवसेना कधी घाबरत नाही. आम्हाला बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. करेंगा, आम्ही डरेंगा नाही, असे म्हणत शिवसैनिक फायर असल्याचे  सांगत पुष्पा स्टाईल करुन दाखवली. तिचा उत्साह पाऊस शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी भजन म्हटले.

 नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा निर्णय घेतल्याने मातोश्रीबाहेर प्रचंड नाट्य दिसून आले. सध्या सुरू असलेल्या लाऊडस्पीकर आणि अजानच्या वादात, खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा, जे अपक्ष आमदार आहेत, यांनी ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय नाट्य रंगले. राणा यांच्या दाव्यानंतर लगेचच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली, त्यानंतर मातोश्री आणि राणा यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली.