मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनानंतर शिवसैनिकांची गर्दी, समर्थनार्थ घोषणाबाजी

शिवसैनिक सोबत असेल तर... मुख्यमंत्र्यांचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन

Updated: Jun 22, 2022, 07:49 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनानंतर शिवसैनिकांची गर्दी, समर्थनार्थ घोषणाबाजी title=

Maharashta Political Crisis : महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर आज संध्याकाळी उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. 

शिवसेना आमदारांच्या बंडानंतर मुख्यमंत्रीपदाचा आणि शिवसेना पक्षप्रमुखपदाचा राजीनामा देण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी दाखवलीय.  शिवसेनेच्या आमदारांनाच आपण मुख्यमंत्रीपदी नको असू, तर त्यांनी सरळ समोर येऊन सांगावं, आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार आहोत, असे त्यांनी जाहीर केलं.

याबरोबरच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केलं.  शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

त्यानंतर संध्याकाळी मुंबईतील शिवसेनेचे काही महत्वाचे पदाधिकारी वर्षावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते. उद्धव ठाकरे यांनी सर्वांना बाहेर येवून नमस्कार केला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांच्या गळ्याभोवती शाल गुंडाळलेली होती. 

दरम्यान, माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय, पण समोर येऊन बोला असं आवानही उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे.