दीपक भातुसे, मुंबई : काँग्रेसच्या मागणीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ओबीसी राजकीय आरक्षण प्रश्नी ही बैठक बोलवण्यात आली आहे. उद्या सकाळी 11 वाजता सह्याद्रीवर ही बैठक होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या दिलेल्या निकालानंतर यातून मार्ग काढण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण कशा पद्धतीने देता येईल त्याचा फॉर्मुला ठरवण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे.
या सर्वपक्षीय बैठकीला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, राज ठाकरे, राजू शेट्टी यांच्यासह लहान मोठ्या पक्षांच्या 27 नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.