Corona : मास्क न वापरणाऱ्यांविरोधात रेल्वेची पुन्हा एकदा धडक कारवाईला सुरुवात

लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुन्हा एकदा कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. ओमाय़क्रॉन व्हायरसमुळे पुन्हा एकदा धोका वाढत आहे. त्यामुळे रेल्वेने देखील आता कारवाईला सुरुवात केलीये.

Updated: Dec 27, 2021, 07:31 PM IST
Corona : मास्क न वापरणाऱ्यांविरोधात रेल्वेची पुन्हा एकदा धडक कारवाईला सुरुवात title=

मुंबई : मध्य रेल्वेने मास्क न लावणाऱ्या प्रवाशांविरोधात पुन्हा एकदा तीव्र कारवाई सुरु केली आहे. 26 डिसेंबर रोज मास्क न घातल्याबद्दल मध्य रेल्वेने 190 जणांना दंड ठोठावला आहे. ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता रेल्वेने पुन्हा एकदा कारवाई तीव्र केलीये.

मध्य रेल्वेने रेल्वे आणि प्लॅटफॉर्मवर मास्क न घालणाऱ्या व्यक्ती तसेच प्रवाशांविरोधात कारवाई सुरु केलीये. काल एका दिवसात असा लोकांकडून 35,150/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. डिसेंबर 2021 मध्ये 26 दिवसात 1,710 व्यक्तींकडून 2.6 लाख दंड वसूल करण्यात आलाय.

मुंबई विभाग - 2,628 प्रकरणे आणि रु. 5.13 लाख दंड वसूल
भुसावळ विभाग – 12,808 प्रकरणे आणि रु. 15.02 लाख दंड वसूल
नागपूर विभाग – 6,591 प्रकरणे आणि रु. 13.18 लाख दंड वसूल
सोलापूर विभाग - 2,118 प्रकरणे आणि रु. 4.56 लाख दंड वसूल
पुणे विभाग - 2,580 प्रकरणे आणि रु. 6.09 लाख दंड वसूल

मध्य रेल्वे प्रवाशांना मास्क घालण्याचे आवाहन केलेय. तसेच योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचा आणि कोविड-19 साठी अनिवार्य केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना ही केल्या आहेत.

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा नवा प्रकार धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लसीकरणावर भर दिला जात आहे.