रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वे खोळंबली

ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं रेल्वे रुळ दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेतलंय

Updated: Jan 2, 2019, 09:31 AM IST
रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वे खोळंबली title=

मुंबई : नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी मध्य रेल्वे पुन्हा एकदा रखडलीय. रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक खोळंबलीय. सायन आणि कुर्ला या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. 

सकाळच्या कामाला निघालेल्या कर्मचाऱ्यांनी स्थानकावर गर्दी असतानाच वाहतुकीवर परिणाम झालाय. त्यामुळे मध्य मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारे चाकरमानी खोळंबलेत. 

दरम्यान, ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं रेल्वे रुळ दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेतलंय.  

पण, नवीन वर्ष सुरू झालं तरी चाकरमान्यांना मात्र काही रेल्वेच्या प्रश्नांनी दिलासा दिलेला नाही.