मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक, यावेळेत धावणार लोकल

या वेळेत असणार मेगाब्लॉक 

Updated: Apr 23, 2021, 08:16 PM IST
मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक, यावेळेत धावणार लोकल title=

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. २५.४.२०२१ रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी आपल्या उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व विद्याविहार दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी  ३.५५ पर्यंत या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. 

सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणा-या धिम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील  तसेच या सेवा मशिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, आणि विद्याविहार या स्थानकांवर थांबणार  नाहीत व त्यानंतर नियोजित मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

घाटकोपर येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२ पर्यंत  सुटणा-या अप- धिम्या मार्गावरील रेल्वे सेवा  विद्याविहार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत तसेच या सेवा विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मशिद या स्थानकांवर थांबणार  नाहीत. 

 ब्लॉक कालावधीत अप व डाउन धिम्या मार्गावरील रेल्वे सेवा मशिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, आणि विद्याविहार या स्थानकांवर  उपलब्ध होणार नाहीत.  कुर्ला-वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ पर्यंत वाशी / बेलापूर / पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा तसेच पनवेल/ बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला दरम्यान तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.३० या वेळेत मेन लाइन आणि ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.