रेमडेसिवीरसाठी राज्य सरकारची थेट आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिरात; युद्धस्तरावर नियोजन सुरू

राज्य सरकारने रेमडेसिवीर मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्याची माहिती मिळतेय.

Updated: Apr 23, 2021, 04:01 PM IST
रेमडेसिवीरसाठी राज्य सरकारची थेट आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिरात; युद्धस्तरावर नियोजन सुरू title=

मुंबई :  कोरोनाचं  थैमान राज्यात इतकं वाढलं आहे की, सर्व यंत्रणा हतबल झाल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व प्रयत्न अपुरे पडत आहे. राज्यातील रुग्णांना रेमडेसिवीरसाठी अत्यंत कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने रेमडेसिवीर मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्याची माहिती मिळतेय.

कोरोना आणखी काय काय रुप दाखवेल याचा भरवसा नाही. देशात कोरोना संसर्गामुळे हाहाकार उडाला आहे. राज्यातही रुग्णांच्या दगवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या उपचारासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता संपूर्ण राज्यात आहे. 

राज्य सरकारने केंद्र आणि इतर राज्यांमधून रेमडेसिवीर मिळते का याची तपासणी करून झाली आहे.  त्यामुळे राज्य सरकारने थेट आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये रेमडेसिवीरसाठी जाहिराती दिल्या आहेत.

या जाहिरातींना काही देशातून प्रतिसादही आल्याची माहिती समोर येत आहे. सिंगापूर, बांग्लादेश, इजिप्त या देशांनी रेमडेसिवीर इंजेक्शन  पुरवण्याची प्राथमिक तयारी दर्शवली आहे. राज्य सरकारचा या देशांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याचा प्रयत्न आहे. लवकरच त्याबाबतची प्रकिया सुरू करणार असल्याची माहिती मिळतेय.