मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांना पुढचे तीन दिवस अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मुंबईची लाईफलाइन म्हटल्या जाणाऱ्या 953 लोकल ट्रेन सेवा गुरुवार मध्यरात्रीपासून रविवार दुपारपर्यंत रद्द करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने दररोज कामानिमित्त मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
930 लोकल सेवा रद्द केल्यामुळे लोक रोडमार्गाने सीएसएमटी गाठण्याचा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत लोकल ट्रेनने दररोज प्रवास करणारे अनेक प्रवासी त्यांची खासगी वाहने, ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमधून प्रवास करतील. त्याचवेळी, 63 तासांच्या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर बेस्ट, एसटी, टीएमटीने सुमारे 350 जादा बसफेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत शहरात वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक विभागाने ब्लॉकचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागात अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
63 hrs Special Block at Thane (DN Fast line) began at 00.30 am on 30/31.05.2024.
The work for widening of platform no. 5/6 of Thane Station started with the dismantling of existing tracks. pic.twitter.com/WaUspKoY4u
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) May 30, 2024
पुढचे तीन दिवस मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठे जिकरीचे असणार आहेत कारण गुरुवारी मध्यरात्री साडे बारापासून मध्य रेल्वेवरील महा मेगाब्लॉकला सुरुवात झाली आहे. तब्बल 63 तासांचा हा मेगाब्लॉक असून रविवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील 10 आणि 11 क्रमांकाच्या फलाटाची लांबी वाढवण्यासाठी तर ठाणे स्थानकावरील 5आणि 6 फलाट क्रमांकांची रुंदी वाढवण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.
ब्लॉक दरम्यान प्रवाशांकडून जास्त भाडे आकारणे ऑटो किंवा टॅक्सी चालकांना महागात पडू शकते. ऑटो, टॅक्सीमध्ये प्रवाशांना न बसवणाऱ्या किंवा जास्त पैशांची मागणी करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यासाठी आरटीओची विशेष पथके वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.
प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून बेस्ट सेवा पुरविण्यात आली आहे. बेस्टतर्फे दादर - सीएमटी दरम्यान 80, कुलाबा - वडाळा दरम्यान 72, सीएमटी - धारावी दरम्यान 30, सीएमटी - भायखळा आणि राणी लक्ष्मीबाई चौक दरम्यान 20 अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. दादलानी पार्क ते दादलानी पार्क दरम्यान चालवले जाईल. कुर्ला नेहरूनगर, परळ, दादर आणि ठाणे दरम्यान 50 जादा बसेस चालवण्याची एसटीची योजना आहे. तर टीएमटी ठाणे-घाटकोपर, ठाणे-कुर्ला दरम्यान जादा बसेस चालवणार आहे. टीएमटी दर 15 मिनिटांच्या अंतराने बसेस चालवणार आहे.