Sanjay Raut यांच्या अडचणीत आणखी वाढ; वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 ईडीने ताब्यात घेतल्यानंतर आणखी एका प्रकरणामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत

Updated: Jul 31, 2022, 11:42 PM IST
Sanjay Raut यांच्या अडचणीत आणखी वाढ; वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर आणखी एका प्रकरणामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

संजय राऊत यांच्याविरोधात व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

स्वप्ना पाटकर यांनी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी याच तक्रारीनंतर संजय राऊत यांच्या विरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाकोला पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दखलपात्र गुन्ह्यात वर्ग केला.

स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीनंतर शनिवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. मात्र आता संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४, ५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्ना पाटकर रविवारी वाकोला पोलीस ठाण्यात जावाब नोंद करण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे
स्वप्ना पाटकर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची लेखी तक्रार पोलिसांना केली होती.