संप मागे घ्या, लोकांची गैरसोय होतेय; सरकार चर्चेला तयार - अनिल परब

Anil Parab on ST bus strike : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे.  

Updated: Nov 11, 2021, 02:11 PM IST
संप मागे घ्या, लोकांची गैरसोय होतेय; सरकार चर्चेला तयार - अनिल परब title=
Pic Courtesy : twitter

मुंबई : Anil Parab on ST bus strike : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. आमचे निलंबन करा, बडतर्फ करा, आता माघार नाही, असा निर्धार करत एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. तर दुसरीकडे संप मागे घ्या, लोकांची गैरसोय होत आहे, असे आवाहन परिवहनमंत्री अनिल परब यांनी केले आहे.

 मी अशा लोकांचे मी नेतृत्व करत नाही - राज ठाकरे

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील अनेक बस स्थानकांत शुकशुकाट दिसून येत आहे. मात्र, एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. संप मागे घेतला नाही तर संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात जिल्हा कामगार न्यायलयात दावे दाखल करण्याचा एसटी प्रशासनाचे निर्देश देण्यात आले आहे. कामगार न्यायलयाने संप अवैध ठरवल्यास कामगारांना आर्थिक दंड ठोठवला जाऊ शकतो.

न्यायालयाच्या आदेशाचं पालन करा - परब

पहिला संप मागे घ्या, लोकांची गैरसोय होत आहे. सदाभाऊ खोत यांना समजावून सांगितले आणि त्यांनी बाहेर जावून वेगळेच सांगितले, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे. विरोधी पक्षनेत्यांशी चर्चेला तयार आहोत. पण त्यांच्या मनात काय आहे ते माहिती नाही. वाईट स्थितीत असलेल्या एसटीचे आणखी नुकसान करू नका, असे अनिल परब म्हणाले.

एसटीचे 100 कोटींचे नुकसान : पाहा राज्यातील सध्याची स्थिती 

कामगार राजकीय बळी ठरत आहेत. वस्तुस्थितीत चूक असेल तर दाखवा. त्यांनी संपाचे बेकायदेशीर  हत्यार उपसलंय तर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत. त्यांची भाषा पाहिली तर संप चिघळण्याचे काम केले जात आहे. त्यांनी त्यांच्या (भाजप सत्ताकाळात) काळात मग विलिनीकरण का नाही केले. मग त्यांनी एअर इंडिया कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून का नाही घेतले, असा पलटवार अनिल परब यांनी भाजपवर केला आहे.

आज ते (भाजप) थातूरमातूर बोलत आहेत. त्यांनी मग पूर्ण व्हिडिओ दाखवावा. आजच्या बैठकीचे अजून ठरलेले नाही. समोरून अजून  कुठलाही प्रतिसाद नाही मिळाला. आंदोलन चिघळवण्याचे काम यांनी केले आहे. आम्हाला काही एसटी बंद ठेवण्यात किंवा खासगी बसेसना स्टँडवर आणण्यात रस  नाही. प्रविण दरेकरही शिवसैनिक होते हे विसरू नये, असे अनिल परब म्हणाले.