Abhishek Ghosalkar: शिवसेना ठाकरे गटाचे दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची मोठी घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ देखील आता व्हायरल झाला आहे. अभिषेक घोसाळकर मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीबरोबर फेसबूक लाईव्ह करत होते. फेसबूक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. यावेळी मॉरिस भाईने 5 गोळ्या झाडल्याचं म्हटलं गेलंय.
मॉरिस भाई हा दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. यावेळी स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखलं जातं. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता. कोरोना काळात मॉरिस भाई यांनी स्थानिकांसाठी काम केलं होतं.
माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर आहेत. वडिलांप्रमाणेच अभिषेक घोसाळकर यांनी सुरुवातीला समाजकार्यास सुरुवात केली होती. यावेळी त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली होती. अभिषेक घोसाळकर हे दोनदा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेत. दहिसरमधील तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. घोसाळकर हे दहिसर कांदरपाडा वॉर्ड नंबर 7 चे नगरसेवक होते.
ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आलाय. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. गंभीर अवस्थेतल्या अभिषेक घोसाळकरांना दहिसरच्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेत अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस या दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती सोमर आली आहे.
फेसबूक लाईव्हमध्ये अभिषेक घोसाळकर मुंबई ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई बसेस सोडण्याविषयी सांगत होते. तसंच सर्वांनी एकत्र काम करुयात असंही म्हणताना दिसातयत. आयसी कॉलनी, गणपत नगर, कांदळपाडा परिसरात चांगलं काम करायचं आहे. ही सुरुवात आहे, पुढे अजून काम करायचं आहे असंही अभिषेक घोसाळकर म्हणत होते. घोसाळकर भाषण संपवून ते तिथू उठले तितक्यात त्यांच्यावर मॉरीसने गोळीबार केला. अभिषेक घोसाळकर यांना तातडीने जवळच्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.