मुंबई : राज्यात मंत्रीमंडळाच्या विस्ताराची शक्यता बळावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या परदेश दौऱ्यापूर्वीच मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
उद्या आणि परवा होणाऱ्या भाजप प्रदेश कार्यकारिणीत यासंदर्भात निर्णय होण्याची चिन्ह आहेत. मंत्रीमंडळ विस्तार, फेरबदल आणि कामगिरी खालावलेले आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांच्या गच्छंतीबाबत फैसला करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
एसआरए घोटाळ्याचे आरोप झालेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांबाबतही कार्यकारिणीच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे... आणि यामुळेच राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेलाही पुन्हा ऊत आलाय.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या असून सरकारही स्थिर आहे. त्यामुळं महामंडळ वाटपासाठी भाजपाचे अनेक इच्छुक आमदार देव पाण्यात घालून बसले आहेत.