मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा केवळ मुस्लिमांच्याच नव्हे तर ४० टक्के हिंदूंच्याही विरोधात आहे. जो कुणी विरोध करेल त्यांचं नागरिकत्व काढून घेण्याचा हा डाव आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात काढलेल्या मोर्चापुढं भाषण करताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीचं नेतृत्व ब्लॅकमेल करणारं आहे, असा टोलाही आंबेडकरांनी यावेळी लगावलाय.
अधिक वाचा : 'मुस्लिमांच्या वास्तव्यास १५० देश आहेत, तर हिंदुंसाठी फक्त एकच'
अधिक वाचा : एनपीआर आणि एनआरसीचा परस्पराशी काहीही संबंध नाही- अमित शहा
अधिक वाचा : चर्चेपूर्वी जाणून घ्या, NRC आणि NPR मध्ये नेमका फरक काय
अधिक वाचा : CAA : कायदा ४० टक्के हिंदूंविरोधात, हिंमत आहे का अटक करण्याची? - आंबेडकर
अधिक वाचा : 'म्हणून डाव्या विचारसरणीच्या लोकांना मोर्चाची परवानगी नाकारली!'
गेल्या काही दिवसांपासून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (Citizenship Amendment Act -CAA), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Register - NPR)आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Register of Citizens-NRC) असा वाद सुरू आहे. एनपीआर आणि एनआरसीचा परस्पर काहीही संबंध नसल्याचं गृहमंत्री अमित शाह सांगत असले तरीदेखील याविरोधात देशभर आंदोलनं सुरूच आहेत.