गौतम अदानी यांची रेकॉर्डब्रेक कमाई, 24 तासात संपत्तीत 1,91,62,33,50,000 रुपयांची भर

Gautam Adani Networth : उद्योगपती गौतम अदानी यांच्या कमाईत गेल्या तीन दिवसात मोठी भर पडली आहे. गेल्या 24 तासात अदानी समूहाने तब्बल 12.3 अरब डॉलरची कमाई केली आहे. यामुळे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी 15 व्या स्थानावर पोहोचले आहेत. 

राजीव कासले | Updated: Dec 6, 2023, 03:27 PM IST
गौतम अदानी यांची रेकॉर्डब्रेक कमाई, 24 तासात संपत्तीत 1,91,62,33,50,000 रुपयांची भर title=

Gautam Adani Networth : अदानी उद्योग समूहाचे संस्थापक उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत गेल्या काही दिवसात मोठी भर पडली आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी गेल्या 24 तासात सर्वाधिक कमाई करणारे उद्योगपती ठरले आहेत. अदानी समुहाच्या नेटवर्थमधमध्ये (Gautam Adani Networth) एका दिवसात तब्बल 12.3 अरब डॉलर म्हणजे  1,91,62,33,50,000 रुपयांची भर पडली आहे. एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारे नंबर वन अरबपती बनले आहेत. 

गौतम अदानी यांची संपत्ती
ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने (Bloomberg Billionaires Index) जारी केलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी गौतम अदानी यांनी एकाद दिवसात 4 अरब डॉलरची कमाई केली. तर मंगळवारी मोठी झेप घेत अवघ्या 24 तासात 12.3 अरब डॉलरची कमाई केली. एका दिवसातील कमाईच्या आकडेवारीत गौतम अदानी यांनी एलन मस्कपासून बर्नार्ड अर्नाल्टपर्यंतच्या कमाईपेक्षा Top-3 Billionaires कितीतरी पटीने अधिक आहे. 

एलन मस्क (Elon Musk) यांची संपत्ती  2.25 अरब डॉलर, जेफ बेजॉस (Jeff Bezos) यांची संपत्ती 1.94 अरब डॉलर आणि बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault)यांची संपत्ती 2.16 अरब डॉलर वाढली आहे. 

श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पंधराव्या स्थानावर
एका दिवसात केलेल्या या विक्रमी कमाईमुळे गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. श्रीमंताच्या यादीत अदानी यांनी 4 स्थानांची बढत घेतली आहे. 20व्या स्थानावरुन ते 16 व्या स्थानावर पोहोचले होते. पण संपत्तीत आणखी 82.5 अरब डॉलरची भर पडल्याने गौतम अदानी (Adani World's 15th Richest) थेट 15 व्या स्थानावर पोहोचले आहेत. 

अदानी समूहाचे शेअर वाढले
Gautam Adani यांच्या संपत्ती वाढीमागे त्यांच्या कंपनीच्या शेअरला मिळालेली तेजी कारणीभूत ठरली आहे. गेल्या तीन दिवसात Adani Group चे शेअर रॉकेटच्या वेगाने वरती गेले. Adani Total Gas चा शेअर 18.66 टक्के आणि Adani Green Energy Share 14.1 टक्के तेजीत आहे. याशिवाय अदानी पोर्ट (Adani Port), अदानी पावर (Adani Power), अदानी विल्‍मर (Adani Wilmar) यांना सुद्धा मोठी मागणी आहे.