अल्पवयीन मुलाचा आजीवर प्राणघातक हल्ला...

मुंबईतील धारावी येथे एका मोठ्या सोने व्यापाराच्या अल्पवयीन मुलाने आपली चोरी पकडली जाईल या भीतीने आपल्या शेजारील ७० वर्षीय आज्जीला प्राण घातक हल्ला केलाय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 18, 2017, 08:58 PM IST
अल्पवयीन मुलाचा आजीवर प्राणघातक हल्ला... title=

मुंबई : मुंबईतील धारावी येथे एका मोठ्या सोने व्यापाराच्या अल्पवयीन मुलाने आपली चोरी पकडली जाईल या भीतीने आपल्या शेजारील ७० वर्षीय आज्जीला प्राण घातक हल्ला केलाय. 

या हल्यात ७० वर्षीय सविताबेन वारीया गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. धारावी येथील ९० फ़ीट रोड येथे राहणा-या एका व्यापा-याचा मुलगा त्याच्या शेजारी राहणा-या ७० वर्षीय सविताबेन वारीया यांच्या घरी गेला तेथे त्याने नाश्ता ही केला. त्या दरम्यान त्याची नजर सविताबेनच्या घरातील पाकिटावर पडली आणि त्याने ते पाकिट सविताबेनची नजर चुकवून चोरण्याचा प्रयत्न केला. पण, सविताबेनची त्याच्यावर नजर पडताच. तो अल्पवयीन मुलगा घाबरला आणि आपली चोरी पकडली गेली घरच्यांना कळाले तर काही खरं नाही या भीतीने त्या अल्पवयीन मुलाने सविताबेनवर चाकू, धोपटणे, लाठी, कैचीने सविताबेनवर हल्ला केला. 

पण,  त्यातूनही सविताबेन बचावल्याने त्याने टॉवेलने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लादी पुसण्याचे लिक्वीड देखील सविताबेनला पाजले... आणि १ लाख ९० हजार रुपये घेउन त्या अल्पवयीन मुलाने पोबारा केला... पण सविताबेनच्या मुलाने चोरीची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्या मुलाकडे चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला... 

त्या अल्पवयीन मुलाला न्यायालयात हजर केले असून ते अल्पवयीन असल्याने त्याची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आलीये...