बीएमसीला औषधांसाठीचा पैसा वाचवता आला असता

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं लाखो रूपये किंमतीची औषधे गरजू रूग्णांना वाटला गेला नाही.

Updated: Aug 10, 2017, 06:33 PM IST
बीएमसीला औषधांसाठीचा पैसा वाचवता आला असता title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं लाखो रूपये किंमतीची औषधे गरजू रूग्णांना वाटला गेला नाही.  तसेच ३ वर्षांपासून तसाच साठा करून ठेवल्याचा प्रकार झी २४ तासने समोर आणला होता. 

तसंच या औषधांची मुदतही संपून गेल्यानं ती वापरण्या योग्यही राहिली नव्हती. यामुळे पालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचं वृत्त झी 24 तासनं दाखवलं होतं. याची पालिकेच्या आरोग्य विभागाने दखल घेतलीय. 

पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत. वांद्रे ते दहिसर या पश्चिम उपनगरातील पालिकेच्या डिस्पेन्सरीमार्फत ही औषधं वाटण्यासाठी आणली होती.