मुंबई : कर्जमाफीच्या घोषणेपाठोपाठ राज्यात पुन्हा मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेनं उचल खाललीये. प्रदेश भाजपा विधानसभा निवडणूकीसाठी तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही भाजपाच्या मध्यावधीसाठी कायम तयारी असल्याचं सांगत या चर्चेला आणखी हवा दिलीये.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध्यावधी निवडणुकीबाबत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांसमोर भाजपकडून सादरीकरण केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र मध्यावधी निवडणुकीसाठी पैसे असतील, तर शेतकऱ्यांना द्या असा टोला भाजपला लगावलाय.
शेतकरी आंदोलनाच्यावेळी काही पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा केली. त्यांना उत्तर देताना आम्ही मध्यावधीला तयार असल्याचं आम्ही सांगितलं होतं, असं मुख्यमंत्री म्हणालेत.
मध्यावधी झाल्यास भाजपाच पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. बघुयात मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे काय म्हणालेत...