आताच काय यापुढेही शिवसेनेसोबतच लढू! अमित शाह यांना विश्वास

२०१९ साठी शिवसेनेसोबत युती होईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केलाय.

Updated: Jun 6, 2018, 07:59 PM IST

मुंबई : आगामी लोकसभाच नव्हे तर विधानसभा निवडणुकाही शिवसेनेसोबत युती करून लढवणार असल्याचा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी झी २४ तासला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केलाय. झी २४ तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांनी अमित शाह यांची मुलाखत घेतली. उद्धव ठाकरेंशी चर्चा करून नाराजी दूर करण्यात यश येणार असा विश्वासही त्यांनी या विशेष मुलाखतीत व्यक्त केलाय. आत्ताच काय यापुढेही शिवसेनेसोबत लोकसभा-विधानसभा निवडणूक लढू असं अमित शाहंनी म्हणलं.

अमित शहांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे 

- देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित

- अभिव्यक्ती स्वातंत्र्य देशविरोधी नसावी

- आमचे विरोधक टीकेनंतरही अबाधित

- आणीबाणी लागू करणा-यांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची शिकवण देऊ नये.

- प्रणवदा यांच्या संघ कार्यक्रमात जाण्याचं समर्थन

- प्रणवदा संघ कार्यक्रमात गेले तर गैर काय?

- पोटनिवडणुकीत काँग्रेसपेक्षा आमचं राजकीय यश मोठं

- काँग्रेसचं राजकीय अस्तित्व आक्रसत चाललंय

- मोदींना गरिबी हटवायचीय तर विरोधकांना मोदींना हटवायचं आहे 

- विरोधकांची एकजूट म्हणजे राज्यापुरत्या नेत्यांचा समूह 

- पश्चिम बंगालमध्ये आम्हाला २२ जागा मिळतील 

- भाजप सरकार विरोधात जनभावना नाही

- आगामी निवडणूका असलेल्या राज्यात आमचं पक्ष संघटन मजबूत

- नरेंद्र मोदींनी जगात भारताचा गौरव वाढवलाय

- भारतीय लोक देशाचा गौरव वाढवणाऱ्या नेत्याच्या शोधात होते

- मोदी २४ पैकी १८ तास काम करतात

- महाराष्ट्रातील फडणवीस सरकार लोकाभिमुख

- जनता फडणवीस सरकारवर विश्वास दाखवेल

- माध्यमे नकारात्मक घटना दाखवत असल्याने संपर्क फॉर समर्थन ही मोहीम

- संपर्क फॉर समर्थन अंतर्गत आमच्या चांगल्या कामांचा घरोघर प्रचार

- आम्ही विरोधकांवर सूड उगवत नाही

- भ्रष्टाचारी व्यक्तीला बेकायदा तुरुंगात घालण्याचा आमचा डाव नाही

- आमच्या सरकारने भ्रष्टाचार विरोधात अनेक ठोस पावलं उचलली

- भारताची अर्थव्यवस्था भाजपच्या काळात बळकट झाली

- अजूनही खूप काम राहिलंय

- मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हीच २०१९ मध्ये जिंकू

- आगामी निवडणुकीत मोदी सरकारचे बहुमत वाढेलच