'भाजप पुरस्कृत राजवटीने रेसकोर्सची जागा हडपली', आदित्य ठाकरेंचे सरकारला 4 प्रश्न

Racecourse Issue: रेसकोर्सच्या मुद्द्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Mar 12, 2024, 08:21 PM IST
'भाजप पुरस्कृत राजवटीने रेसकोर्सची जागा हडपली', आदित्य ठाकरेंचे सरकारला 4 प्रश्न title=
Aaditya Thackeray On Racecourse

Racecourse Issue: रेसकोर्सच्या मुद्द्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत.  भाजप पुरस्कृत राजवटीने रेसकोर्सची जागा हडपल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. अजूनही काही प्रश्न अनुत्तरित असल्याचे म्हणत त्यांनी सरकारला 4 प्रश्न उपस्थित केले आहेत. 

आदित्य ठाकरेंनी काय विचारले प्रश्न? 

1) रेसकोर्सच्या एका कोपऱ्यात असलेल्या छोट्या झोपड्या/घरांतील कुटुंबांचे पुनर्वसन कसे होणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत याबाबत स्पष्टता नसल्याचे त्यांनी म्हटले. माझ्या माहितीनुसार, हे मिंधे सरकार आपल्या लाडक्या बिल्डरकरवी रेसकोर्सवर 'झोपू' योजना राबवेल, असा आरोप त्यांनी केला. 

2) खासगी तबेल्यांच्या पुनर्बांधणीसाठी मुंबईकरांचे 100 कोटी का घालवायचे? असा प्रश्न विचारत या घोड्यांचे मालक आणि @rwitcmumbai त्यासाठी लागणारी किमत मोजायला समर्थ आहेत, असे ते म्हणाले.

करीरोडचं लालबाग, सँडहर्स्टचं डोंगरी आणि... मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख

3) आम्ही आधीच कोस्टल रोड येथे भूमिगत कार पार्किंगची व्यवस्था केली असताना आता रेसकोर्स येथे भूमिगत कार पार्किंग उभारण्याची गरजच काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

हे केवळ सीएम(कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांच्या) ठेकेदार मित्राला काम देण्यासाठी केले जात आहे. परिणामी : चार वर्षे खोदकाम सुरू राहील. रेसकोर्स बंद राहील आणि मुंबईचे वायू प्रदूषण वाढत राहील, असा आरोप त्यांनी केला. 

4)  हे भाजप पुरस्कृत सरकार आम्ही कोस्टल रोड प्रकल्पासाठी राखून ठेवलेला 96 हेक्टरचा हरित पट्टाही याला जोडून असल्याचे दाखवत आहे. हे हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. नशीब त्यांनी 'अरबी  समुद्र' त्यांच्या 'थीम पार्क'चा भाग म्हणून दाखवला नाही, असा टोला त्यांनी लगावला. 

महालक्ष्मी रेसकोर्सनंतर बेकायदा मुख्यमंत्र्यांचा बिल्डर मित्र वेलिंग्टन क्लब, सीसीआय आणि आणखी मोकळ्या जागांना  लक्ष्य करेल, असे त्यांनी सांगितले. आमचे सरकार लवकरच सत्तेत येईल आणि ही लूट थांबवेल, ह्याची मला खात्री असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईकरांसाठी Good News! न्यूयॉर्क-लंडनसारखे सेंट्रल पार्क आपल्या मुंबईत उभारणार