DNA चा वाद पेटला; उद्धव ठाकरेंचा डीएनए तपासण्याची वेळ आलेय; भाजपचा टोला

उद्धव ठाकरेंचा डीएनए तपासण्याची वेळ आली आहे असा टोला भाजप नेते प्रसाद लाड यांनी लगावला. 

Updated: Nov 17, 2022, 06:42 PM IST
DNA चा वाद पेटला; उद्धव ठाकरेंचा डीएनए तपासण्याची वेळ आलेय; भाजपचा टोला title=

Maharashtra politics, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आता डीएनएवरुन वाद पेटला आहे.  सर्वांचा डीएनए एक म्हणणा-या संघाचा डीएनए चेक करायला हवा असं म्हणत  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) यांनी थेट सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली. ठाकरेंच्या टीकेवरुन भाजपने पलटवार केला आहे.  उद्धव ठाकरेंचा डीएनए तपासण्याची वेळ आली आहे असा टोला भाजप नेते प्रसाद लाड(Prasad Lad) यांनी लगावला. 

सर्वांचा डीएनए एक म्हणणा-या संघाचा वारसा नेमका काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.  आरएसएसचा राजकारणातला डीएनए चेक करायला हवा असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी लगावला. कारण आता सर्वच आदर्श त्यांना त्यांचे वाटायला  लागले आहेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले. सरसंघचालकांवर टीका करणा-या उद्धव ठाकरेंचा आणि आदित्या ठाकरेंचाच डीएनए तपासण्याची वेळ आल्याची टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. सावरकरांबद्दल प्रेम, आदर आणि निष्ठा आहे. स्वातंत्र्यसंग्रामाशी ज्यांचा संबंध नाही त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. सावरकरांच्या विचारावर वागायला शिका, मगच बोला असा टोला ठाकरेंनी भाजपला लगावला.