मुंबई : सध्या महाराष्ट्रात एका नेत्याच्या व्हिडिओची चर्चा आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Bjp Leader Chitra Wagh) यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आणि आरोप-प्रत्यारोपांना आणखीनच धार चढली. पाहुया कुणाचा आणि नेमका काय आहे हा व्हिडिओ. (bjp leader chitra wagh shared congress nana patole video)
हाच तो भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघांनी ट्विट केलेला व्हिडिओ, या व्हिडिओत नाना पटोले टी शर्टमध्ये दिसतायत.... आणि तसाच टीशर्ट घातलेली एक व्यक्ती एका तरूणीसोबत हॉटेलमध्ये बसलेली दिसतेय. ही व्यक्ती म्हणजे नाना पटोलेच असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केलाय आणि हा व्हिडिओ ट्विट केला.
त्यामध्ये काय नाना, तुम्ही पण झाडी डोंगर आणि हाटीलीत, असा उल्लेख चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये केलाय. एवढंच नाही तर नाना पटोलेंना टॅगही केलंय. नानांचा हा व्हिडिओ आधी व्हायरल झाला, त्यानंतर आपण ट्विट केला, असा दावा चित्रा वाघ यांनी केलाय.
वाघांनी हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर नाना मात्र पुरते भडकलेत. व्यक्तिगत बदनामी करण्याचं हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप नानांनी केलाय. आणि कायदेशीर कारवाईचा इशाराही दिलाय.
नानांचा व्हिडिओ राज्यभरात व्हायरल झालाय. त्यामुळे येत्या काळात व्हिडिओवरुन आरोप-प्रत्यारोपांची जोरदार चिखलफेक होणार आहे. पण या सगळ्यात महाराष्ट्रातलं मुद्द्यांवरचं आणि प्रश्नांचं राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊन पोहोचलंय, हेही पुन्हा समोर आलंय.