'ज्या दिवशी सापडेल त्याच दिवशी तिचं थोबाड रंगवेन' उर्फी जावेदने आव्हान दिल्यानंतर चित्रा वाघ भडकल्या

चित्रा वाघ आणि Urfi Javed मधला वाद टोकाला, उर्फी जावेदला अटक करण्याची चित्रा वाघ यांची मागणी तर उर्फी जावेदचा जोरदार पलटवार

Updated: Jan 2, 2023, 06:04 PM IST
'ज्या दिवशी सापडेल त्याच दिवशी तिचं थोबाड रंगवेन' उर्फी जावेदने आव्हान दिल्यानंतर चित्रा वाघ भडकल्या title=

Chitra Wagh vs Urfi Javed : सोशल मीडियातील वादग्रस्त अभिनेत्री ऊर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचातला वाद टोकाला गेलाय. जिथे सापडेत तिथे उर्फी जावेदला चोप देण्याचा इशारा चित्रा वाघांनी दिलाय. भर रस्त्यावर अतरंगी कपडे घालून फिरणाऱ्या ऊर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) तक्रार नोंदवून अटक करण्याची मागणी केली. त्यावर ऊर्फीनं कारवाईसाठी चित्रा वाघ यांना खुलं आव्हान (Challenge) दिलं होतं. यावरुन आता चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत.

चित्रा वाघ यांनी दिला इशारा
ज्या पद्धतीने नंगा नाच सुरु आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्यांना हा नंगानाच दिसत नाही का? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. आज ट्विट केलं आहे आणि पोलिसात तक्रार केली आहे, पण मला ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी थोबडवून काढेन, काय व्हायचं ते होईल पण महाराष्ट्रात (Maharashtra) हा नंगा नाच आम्ही अजिबात चालू देणार नाही असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. 

चित्रा वाघ यांनी केली पोलिसात तक्रार
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचा एक व्हिडिओ ट्विट करत मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) तिला अटक करण्याची मागणी केली होती. स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या, सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणंघेणं नाही. मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे, असं चित्रा वाघ यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. 

उर्फी जावेदचा पलटवार
चित्रा वाघ यांनी दिलेल्या इशाऱ्यावर उर्फी जावेदनंही पलटवार केला. राजकारणी लोकांना काही काम राहिलं नाही का? असा सवाल उर्फी जावेदने उपस्थित केला. इतकंच नाही तर जर तुम्ही स्वतःची आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संपत्ती जाहीर केली, तर मी आता तुरुंगात जायला तयार आहे, असं उर्फीने म्हटलं आहे. राजकारणी पैसा कसा आणि कुठून कमावतात हे जगाला सांगा. तुमच्या पक्षातील काही पुरुष कार्यकर्ते शोषण प्रकरणातील आरोपी आहेत. त्या महिलांसाठी तुम्ही कधी काही करताना दिसल्या नाहीत, असं आव्हानच उर्फीने चित्रा वाघ यांना दिलं.

कोण आहे उर्फी जावेद?
उर्फी जावेद ही मुळची उत्तर प्रदेशमधल्या लखनऊ इथली आहे. लहान वयातच ती मुंबईत आली. 2016 मध्ये तीने छोट्या पडद्यावर 'बडे भैया की दुल्हनिया' या मालिकेत अभिनय साकारला. पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती बिग बॉसमुळे. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये उर्फी सहभागी झाली होती त्यानंतर ती तरुणांमध्ये कमालीची लोकप्रिय झाली. कसोटी जिंदगी की या मालिकतेही तीने काम केलं. सध्या सोशल मीडियावर आपल्या चित्र विचित्र कपड्यांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. (Urfi Javed Dress Video on Social Media)