स्थापना दिनाच्या निमित्ताने भाजपचं मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन

भाजपाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून भाजपाने मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्श करण्याची तयारी सुरू केली आहे.  येत्या ६ एप्रिल रोजी भाजपाचा मुंबईतील बीकेसी येथे स्थापना दिनानिमित्त महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

shailesh musale Updated: Apr 4, 2018, 08:02 PM IST
स्थापना दिनाच्या निमित्ताने भाजपचं मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन title=

मुंबई : भाजपाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून भाजपाने मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्श करण्याची तयारी सुरू केली आहे.  येत्या ६ एप्रिल रोजी भाजपाचा मुंबईतील बीकेसी येथे स्थापना दिनानिमित्त महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

भाजपची जोरदार तयारी

महामेळाव्यासाठी राज्यभरातून २९ रेल्वे गाड्या आणि पन्नास हजार बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यभरातील बुथवरील कार्यकर्त्यांना या मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा मेळावा करण्याचे उद्दीष्ट्य पक्षाने ठेवलं असून याद्वारे २०१९ च्या निवडणुकीची तयारीही केली जाणार आहे. त्यासाठी बीकेसी इथं महामंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी ३ लाख कार्यकर्त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पाहा कशी आहे व्यवस्था