मुंबई : राज्याच्या राजकारणात येत्या 15 दिवसात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात एका पक्षातील अनेक नेते फुटणार असल्याची माहिती आहे.
राज्यात गेल्या पंधरा दिवसापासून दररोज नवीन राजकीय घडामोडी घडत असताना पुन्हा एक मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याची माहिती पुढे येतेय. राजकीय पक्षात अजून एक मोठी उलथापालथ होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. कोणता राजकीय पक्ष पुन्हा फुटणार की मोठा राजकीय नेत्यांचा प्रवेश याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
राज्यातील कोणत्या पक्षाला मोठा झटका बसेल हे तर येत्या काही दिवसातच कळेल. त्यामुळे आता कोणते नेते कोणत्या पक्षात जाणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला होता. त्यानंतर काही दिवसातच महाविकासआघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा असतानाच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.