राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा मेगा प्लॅन; आज होणार महत्वाची बैठक

राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी महाविकासआघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे

Updated: Jun 7, 2022, 10:34 AM IST
राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा मेगा प्लॅन; आज होणार महत्वाची बैठक title=

मुंबई : राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी महाविकासआघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व आमदारही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीला महत्त्व आलंय. 

राज्यसभा निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी आता शिवसेनेने कंबर कसलीय. शिवसेनेनं सर्व आमदारांना मुंबईत मढ इथल्या हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवलंय. काल रात्रीपासून शिवसेनेचे सर्व आमदार हॉटेल रिट्रीटमध्ये आहेत. आज त्यांना नरिमन पॉईंट्स ट्रायडंट हॉटेलमध्ये हलवण्यात येणार आहेत. आज महाविकास आघाडीची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. बैठकीनंतर महाविकास आघाडीचे आमदारही तिथेच मुक्काम करणार आहेत. 10 जूनला मतदान होईपर्यंत ट्रायडंटमध्येच सत्ताधारी तीनही पक्षाचे आमदार ट्रायडंट हॉटेलमध्ये थांबणार आहेत.

 राज्यसभा निवडणुकीत छोट्या पक्षांना महत्त्व
- पाठिंब्यासाठी प्रमुख पक्षांकडून अपक्ष, छोट्या पक्षांना गळ
- छोटे पक्ष, अपक्ष आमदार 'किंगमेकर' ठरणार
- छोटे पक्ष, अपक्षांचा पाठिंबा कुणाला? 
- गिरीश महाजनांनी विरारमध्ये काल रात्री हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली
- सुप्रिया सुळे यांनी काल जोरगेवार यांची भेट घेतली.