टेलिकॉम क्षेत्रात मोठे डील, टाटा टेलिकॉम उद्योग अंबानींकडे?

आयडीया आणि व्होडाफोनच्या एकत्रिकरणानंतर टेलिकॉम क्षेत्रात मोठे डील होण्याची शक्यता आहे. टाटांचा तोट्यातील टेलिकॉम उद्योग विकत घेण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे वृत्त आहे.

Updated: Aug 4, 2017, 08:31 AM IST
टेलिकॉम क्षेत्रात मोठे डील, टाटा टेलिकॉम उद्योग अंबानींकडे? title=

मुंबई : आयडीया आणि व्होडाफोनच्या एकत्रिकरणानंतर टेलिकॉम क्षेत्रात मोठे डील होण्याची शक्यता आहे. टाटांचा तोट्यातील टेलिकॉम उद्योग विकत घेण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे वृत्त आहे.

आयडीया व्होड़ाफोन नंतर आता टेलिकॉम श्रेत्रात आणखी एक मोठा सौदा होऊ घातलाय. तोट्यामध्ये चाललेला टाटा समहूचा टेलिकॉम उद्योग विकण्यासाठी समूहाचे प्रयत्न सुरु आहेत आणि हा उद्योग विकत घेण्यासाठी रिलायन्स जिओशी चर्चा सुरु असल्याचे वृत्त आहे.

येत्या काही दिवसात टाटांचा टेलिकॉम उद्योग अंबानींनी विकत घेतला तर आश्चर्य वाटायला नको. टाटा आणि अंबानी यांची उद्योग क्षेत्रातली स्पर्धा जगात प्रसिद्ध आहे. टेलिकॉम क्षेत्रातल्या सध्याच्या परिस्थितीमुळे ही स्पर्धा मैत्रीच्या संबंधात बदलतेय का याकडे सर्वांचं लक्ष आहे.