भिवंडीमध्ये हळदीत डीजेवर नाचतानाच पाडला रक्ताचा सडा! कारण वाचून बसेल धक्का

Bhiwandi Crime News: हळद म्हटली की डान्स आला. बेभान, बेधुंद आणि अगदी रावडी डान्स करत मनसोक्त हळदी सोहळ्याचा आनंद घेत असतानाच अचानक मंडपात रक्ताचा सडा पडला.

नेहा चौधरी | Updated: May 23, 2023, 05:20 PM IST
भिवंडीमध्ये हळदीत डीजेवर नाचतानाच पाडला रक्ताचा सडा! कारण वाचून बसेल धक्का title=
bhiwandi Crime New clash between two groups over dj at haldi ceremony maharashtra news in marathi

Bhiwandi Wedding Fight News  : लग्नाची घाई, घरात पाहुण्याची रेलचेल, सगळीकडे उत्साहचं वातावरण...लग्नाला गेलो नाही गेला पण हळदीला तर जायलाच पाहिजे. हदळी सोहळ्याचा उत्साहच काही और असतो. डीजेच्या तालावर रात्रभर बेभान आणि बेधुंद नाचत या सोहळ्याचा उत्साह साजरा केला जातो. मोठ्या प्रमाणात हळद खेळली जाते. पण एका हळदी समारंभाला गालबोट लागला आहे. हळदीचा पिवळ्या रंगाऐवजी हळदीच्या मंडपात रक्ताचा सडा पडला. 

नाचताना धक्का लागला अन्...

सोहळ्याची रंगत चढत असताना डीजेच्या तालावर प्रत्येक जण उत्साहात नाचत असताना दोन गटात तुफान हाणामारी झाली. कारण फक्त नाचताना धक्का लागला म्हणून हळदीच्या मंडपात  धारदार शस्त्र, लोखंडी रॉड, फरशीने हल्ला करण्यात आला. हळदीच्या सोहळ्यात रक्तरंजित थरार घडला. (bhiwandi Crime New clash between two groups over dj at haldi ceremony maharashtra news in marathi )

नेमकं काय घडलं?

संजय जाधव या तरुणाच्या नातेवाईकाकडे 20 मे रोजी हळदीचा सोहळा होता. या सोहळ्यात संजय त्याचा दोन मित्रांसोबत अक्षय आणि राजूसोबत गेला. याच सोहळ्यात दिनेश नावाच्या तरुण त्याचा मित्रांसोबत आला होता. लखन, कैलास, संदीप असं दिनेशच्या मित्रांचे नावं आहेत. हळदीचा सोहळा सुरु झाला डीजे तालावर हे सगळे तरुण नाचत होते. 

डीजेचा आवाज वाढतो होता तिकडे तरुणांचा नाचण्याचा उत्साह शिखरावर होता. अशातच लखन आणि संजय यांचा नाचताना एकमेकांना धक्का लागला. त्यावरून दोघांमध्ये तूतू मैमै झाली. हा वाद पाहून दिनेच्या आत्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण सजंय आणि अक्षयने आत्याला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यामुळे या भांडणाचे रुपांतर तुफान मारामारीत झाले. हा राडा एवढा वाढला की हळदीमध्ये धारदार शस्त्र, लोखंडी रॉड निघाले. 

कुठे घडली घटना?

ही घटना महाराष्ट्रातील भिंवडीमध्ये अंजूर फाटा या परिसरातील साठे नगरमध्ये घडली. हदळीच्या सोहळ्यातील या राड्यामुळे पोलिसांना मंडपात यावं लागलं. या प्रकरणात संजय जाधव, अक्षय जाधव, दिनेश मोरे आणि अजय चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहे. तर लखन जाधव, कैलास धोत्रे  दिनेश मोरे, संदीप उदमेले उर्फ डुबऱ्या, राजू गुंजाळ, संजय जाधव आणि अक्षय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जखमी तरुणांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहे.