मुंबई : मुंबईकरांना लवकरच बेस्ट वीज दरवाढीचा झटका बसणार आहे. वीज दरात २ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव बेस्ट विद्युत विभागाने ठेवला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे बेस्टनं दरवाढीचा प्रस्ताव पाठवलाय. एमईआरसीच्या संमतीनंतर १ एप्रिलपासून नवीन वीज दरवाढ लागू होणार आहेत.
वीज निर्मिती आणि विद्युत विभागाच्या खर्चात वाढ झाल्याने वीज ग्राहकांवर वीज दरवाढीचा बोजा पडणार आहे.
दरम्यान, बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाकडे २ लाख व्यावसायिक आणि ८ लाख निवासी ग्राहक आहेत. वीज ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी बेस्ट टाटा पावरकडून ९०० मेगावॅट वीज खरेदी करते.